रेठरेहरणाक्ष येथे दारुड्या मुलाकडून आई-बहिणीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:22+5:302021-09-11T04:27:22+5:30

इस्लामपूर : रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथे घरजागेच्या वादातून दारुड्या मुलाने आई आणि बहिणीस लाकडी पट्टीने आणि लाथाबुक्क्या घालून मारहाण ...

Mother and sister beaten by drunk boy at Rethreharanaksha | रेठरेहरणाक्ष येथे दारुड्या मुलाकडून आई-बहिणीस मारहाण

रेठरेहरणाक्ष येथे दारुड्या मुलाकडून आई-बहिणीस मारहाण

इस्लामपूर : रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथे घरजागेच्या वादातून दारुड्या मुलाने आई आणि बहिणीस लाकडी पट्टीने आणि लाथाबुक्क्या घालून मारहाण करत जखमी केले. ही घटना गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास घडली.

याबाबत जखमी शोभाताई नामदेव महाडिक (वय ५०) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून संदीप नामदेव महाडिक याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा पोलिसांनी नोंद केला आहे. त्याच्या मारहाणीत मनाली महेंद्र कदम ही बहीणसुद्धा जखमी झाली आहे.

संदीप याला दारूचे व्यसन असल्याने शोभाताई यांनी आपली राहती घर जागा भावाच्या मुलाच्या नावावर केली आहे. त्याचा राग मनात धरून दारू पिऊन आलेल्या संदीप याने आईला शिवीगाळ करत भाच्याच्या नावावर जागा करून माझी वाट लावलीस असे म्हणत लाकडी पट्टीने मारहाण केली. यावेळी मनाली ही भांडण सोडविण्यास आल्यावर तिलाही मारहाण केली. दोघीनी आरडाओरडा केल्यावर शेजारी जमू लागल्याचे दिसल्यावर संदीपने तेथून पलायन केले. हवालदार उत्तम माळी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Mother and sister beaten by drunk boy at Rethreharanaksha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.