घाटमाथ्यावर बहुतांश सभासदांच्या ऊस नोंदीच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:09+5:302021-04-06T04:25:09+5:30
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी घाटमाथ्यावरील कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील सभासदांना दुजाभावाची ...

घाटमाथ्यावर बहुतांश सभासदांच्या ऊस नोंदीच नाहीत
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी घाटमाथ्यावरील
कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील
सभासदांना दुजाभावाची वागणूक
मिळत असल्याच्या मुद्द्यावरून
वातावरण मात्र चांगलेच तापत आहे.
चालू गळीत हंगाम संपत आला तरी बहुतांश सभासद शेतकऱ्यांना ऊसतोड मिळाली नाही. पुढील गळीत हंगामासाठी
लागण केलेल्या उसाच्या नोंदीही
कारखान्याने अद्याप घेतलेल्या नाहीत. यावरून राजकीय वक्रदृष्टीतून सभासदांना अक्रियाशील ठरविण्यासाठीचा खटाटोप अविरतपणे
सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
कारखान्याच्या राजकीय सत्ता संघर्षात घाटमाथ्यावरील सभासद शेतककऱ्यांची अपेक्षित साथ मिळत नाही. यामुळे येथील बहुतांश सभासदांच्या नोंदीच घ्यायच्या नाहीत. ऊस नोंद नाही, असे कारण पुढे करायचे आणि उसाला
तोड द्यायची नाही. यानंतर तुमचा ऊस गाळपाला आला नाही, असे कारण
देत संबंधित सभासदांना अक्रियाशील सभासद ठरवण्यासाठी नोटीस पाठवायची हे कुटील राजकारण करणाऱ्या
सत्ताधीश मंडळींबाबत घाटमाथ्यावरील
सभासद शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
मागील वर्षी ज्या सभासदांना ‘अक्रियाशील’ची नोटीस मिळाली, त्या ऊस उत्पादक सभासदांचा मतदानाचा हक्क अबाधित राहणार की नाही ते याद्या प्रसिद्ध झाल्यावर स्पष्ट होईल. आता मात्र येथील सभासद शेतकरी
आमच्या उसाच्या नोंदी घ्या आणि नोंद झाल्याची अधिकृत पोहोच द्या, असा पवित्रा घेत आहेत. कारखाना प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. कारखान्याच्या सत्ताधारी
मंडळींच्या मर्जीतील काही सभासदांच्या उसाची नोंद घेऊन त्यांना तोड दिली जात
आहे. मात्र, कित्येक सर्वसामान्य शेतकरी
मात्र फक्त कागदावरच सभासद आहेत.
त्यांच्या ऊस नोंदी आणि उसाला तोड
मिळत नाही. हे वास्तव चित्र आहे.
चौकट
‘त्या’ सभासदांना पश्चाताप
घाटमाथ्यावरील काही सभासदांना त्यांचे भागभांडवल आणि ठेवीचे पैसे परत देतो, असे सांगून राजीनामा
देण्यास प्रवृत्त केले. या सभासदांना पैसे मिळाले; पण सभासदत्व गमावून बसले. हे सभासद
आता पश्चाताप करून घेत आहेत.