बोरगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:53+5:302021-05-30T04:22:53+5:30
बोरगाव : वाळवा तालुक्यात बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. आजअखेर आरोग्य केंद्रात कोरोनाचे ११२४ ...

बोरगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण
बोरगाव : वाळवा तालुक्यात बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. आजअखेर आरोग्य केंद्रात कोरोनाचे ११२४ रुग्ण सापडले आहेत. यात ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्युदरातही बोरगावचा प्रथम क्रमांक लागत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बोरगावात ७६५ कोरोना रुग्ण सापडले. त्यातील २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गावनिहाय सर्व्हेत बोरगाव दुसऱ्या क्रमांकाचे कोरोना रूग्णसंख्या आसणारे गाव आहे.
बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बोरगाव, साखराळे, मसुचीवाडी, फार्णेवाडी, बनेवाडी, गैंडवाडी, साटपेवाडी, ताकारी, दुधारी ही नऊ गावे येतात. वाळवा तालुक्यात १२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यात बोरगाव, कामेरी, वाळवा, कुरळप, नेर्ले, बावची, येडेमच्छींद्र, पेठ, नेर्ले, कासेगाव, येलूर व बागणी यांचा समावेश होतो.