शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: सांगली जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार ‘कमळ’ अन् ‘घड्याळा’चे; काँग्रेस, उद्धवसेना, तुतारी'चे किती...वाचा

By अशोक डोंबाळे | Updated: November 29, 2025 15:35 IST

कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष

सांगली : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक १४१ उमेदवार ‘कमळ’ चिन्हावर, तर १०३ उमेदवार 'घड्याळ' चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. धनुष्यबाण चिन्हावर ७७, तर तुतारी चिन्हावर ५३ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वात कमी काँग्रेसने ४२, तर उद्धवसेनेने केवळ नऊ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या कंबरदणातील लक्षवेधी नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांवरच सर्व पक्षांच्या नेत्यांचे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीतील भविष्य अवलंबून आहे.राज्य आणि केंद्रात महायुती आणि महाविकास आघाडी आहे; परंतु नगरपालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत तणावाचे चित्र दिसते. जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत या सहा नगरपरिषदा आणि शिराळा, आटपाडी नगरपंचायतींच्या निवडणुकीत सर्व पक्षांनी प्रतिष्ठेची लढत केली आहे. प्रत्येक पक्षाचा नेता नंबर एक होण्यासाठी कंबर कसून उभा ठाकला आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा बालेकिल्ला अशी जिल्ह्याची ओळख होती, मात्र काँग्रेस आता केवळ पलूस आणि जत या दोन ठिकाणीच आपल्या चिन्हावर लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी उरुण-ईश्वरपूरमध्ये तुतारी चिन्हावर उमेदवार उभे केले आहेत, तर त्याच मतदारसंघातील आष्टा नगरपालिकेसाठी आष्टा शहर विकास आघाडी नेत्यांनी उमेदवार दिले आहेत. जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये तुतारी चिन्हावर केवळ ५३ उमेदवार रिंगणात आहेत. शिंदेसेनेकडून चार नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी आणि नगरसेवकपदांसाठी एकूण ७७ उमेदवार रिंगणात उतरवले गेले आहेत.शिंदेसेनेकडून जत, तासगाव, पलूस, विटा आणि आटपाडी या नगरपालिकांमध्ये महायुतीविरोधात दंड थोपटले आहे. सांगली-लोकसभा निवडणूक मैदानात उतरविणाऱ्या उद्धवसेनेकडून पलूस नगराध्यक्षपदासाठी तसेच पाच उमेदवार आणि तासगाव नगरपालिकेसाठी पाच उमेदवार असे एकूण १० उमेदवार निवडणूक लढवत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील नाराज नेत्यांची मोठी बांधणी करून एकूण १०३ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. अजित पवारांच्या घड्याळाला शिराळ्यात जिल्हा बँक अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा पाठिंबा मिळत आहे. जतमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांनी तुतारीचे नेते सुरेश शिंदे यांच्या हातात घड्याळ बांधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभा केला आहे.

आठ पालिकांतील पक्षनिहाय नगरसेवकपदांसाठी उमेदवार संख्या

  • भाजप : १४१
  • राष्ट्रवादी काँग्रेस : १०३
  • काँग्रेस : ४२
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष : ५३
  • शिंदेसेना : ७७
  • उद्धवसेना : ९

सहा ठिकाणी भाजपच्या उमेदवारांची लढतसहा पालिकांमध्ये नगराध्यक्षपदांसाठी भाजप, राष्ट्रवादीचे उमेदवारसहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या आठ जागांपैकी उरुण-ईश्वरपूर, पलूस, विटा, तासगाव, आटपाडी, जत या सहा ठिकाणी भाजपचे उमेदवार लढत देत आहेत. शिराळा, आष्टा, पलूस, जत, विटा, तासगाव या सहा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर उमेदवार उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस यांनी प्रत्येकी दोन ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले आहेत. शिंदेसेना विटा, आटपाडी, शिराळा, जत या ठिकाणी, तर उद्धवसेनेने तासगाव येथे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Local Body Elections: BJP, NCP lead; Congress, Uddhav Sena trail.

Web Summary : Sangli's local elections see BJP and NCP with the most candidates. Congress and Uddhav Sena have fewer. All eyes are on the results as they impact future elections.