मिरज-पंढरपूर मार्गावर २४ पासून जादा पॅसेंजर
By Admin | Updated: April 19, 2015 00:41 IST2015-04-19T00:41:57+5:302015-04-19T00:41:57+5:30
सुट्टीसाठी सोय : २१ जूनपर्यंत धावणार

मिरज-पंढरपूर मार्गावर २४ पासून जादा पॅसेंजर
मिरज : मिरज-पंढरपूर मार्गावर आठवड्यातून तीन दिवस जादा पॅसेंजर धावणार आहे. २४ एप्रिल ते २१ जूनपर्यंत जादा पॅसेंजर सुरू राहणार आहे. सुट्टीसाठी रेल्वे प्रशासनाकडून जादा पॅसेंजरची सोय करण्यात आली.
मुंबई-पंढरपूर पॅसेंजर पंढरपुरात सहा तास थांबून असल्याने ही रेल्वे तीन महिने मिरजेपर्यंत पाठविण्यात येणार आहे. गाडी क्र. ०१४२७ मिरज-पंढरपूर पॅसेंजर शुक्रवार, शनिवार व रविवारी २.४० वाजता सुटणार व ५.२५ वाजता पंढरपुरात पोहोचणार आहे. गाडी क्र. ०१४२८ पंढरपूर-मिरज पॅसेंजर सकाळी १०.१० वाजता पंढरपुरातून निघून दुपारी दीड वाजता मिरजेत पोहोचणार आहे. सुटीच्या हंगामात पंढरपूरसाठी जादा रेल्वेमुळे प्रवाशांची सोय झाली आहे.
सध्या सुट्टी हंगाम सुरू असून शाळांनाही सुट्ट्यांनाही पडल्या आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्ये वाढ झाली आहे. जादा रेल्वेमुळे प्रवाशांची सोय झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाची प्रवाशांनी स्वागत केले आहे. (वार्ताहर)