बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त; मृत्युसत्र मात्र कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:28 IST2021-05-18T04:28:21+5:302021-05-18T04:28:21+5:30
सांगली : जिल्ह्यात सोमवारी बाधितांपेक्षा हजारावर जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र, परजिल्ह्यातील १२ जणांसह जिल्ह्यातील ४८ जण अशा ...

बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त; मृत्युसत्र मात्र कायम
सांगली : जिल्ह्यात सोमवारी बाधितांपेक्षा हजारावर जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र, परजिल्ह्यातील १२ जणांसह जिल्ह्यातील ४८ जण अशा ६० जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात १,२६५ जणांना कोरोनाचे निदान झाले. जत तालुक्यातील रुग्णांची वाढ अद्यापही कायम आहे.
सलग दुसऱ्या दिवशी बाधितांची संख्या नियंत्रित राहिली आहे. विशेष म्हणजे, सोमवारी बाधितांपेक्षा १०२६ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील ४८ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली ११, मिरज २, कुपवाड १, वाळवा, खानापूर प्रत्येकी ६, जत, तासगाव प्रत्येकी ५, कवठेमहांकाळ, पलूस प्रत्येकी ३, कडेगाव २ तर आटपाडी आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृतांमध्ये समावेश आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या घटली असून, ती आता १५ हजार १५२ झाली आहे. यातील २,४७६ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील २,१६८ जण ऑक्सिजनवर, तर ३०८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी आरटीपीसीआर अंतर्गत २,१९५ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ६५८ जण बाधित आढळले आहेत, तर रॅपिड अँटिजनच्या ३,२६२ जणांच्या तपासणीतून ६६६ जण बाधित आढळले आहेत. परजिल्ह्यातील १२ जणांचा मृत्यू झाला असून, नवीन ५९ जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १,०१,६४८
उपचार घेत असलेले १५,१५२
कोरोनामुक्त झालेले ८३,५२६
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २,९७०
सोमवारी दिवसभरात
सांगली ६४
मिरज ३८
जत २३८
कवठेमहांकाळ १४१
मिरज तालुका १३८
खानापूर १२२
शिराळा ११८
वाळवा ११६
आटपाडी ९१
तासगाव ८७
कडेगाव ८१
पलूस ३१