तासगाव, नागेवाडीच्या बिलांसाठी सोमवारी तासगावात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST2021-06-18T04:19:12+5:302021-06-18T04:19:12+5:30

ते म्हणाले यापूर्वी याच ऊस बिल प्रश्नी १६ एप्रिल व ७ जून रोजी आंदोलन करण्यात आली होती. मात्र, आश्वासन ...

Morcha in Tasgaon on Monday for bills of Tasgaon, Nagewadi | तासगाव, नागेवाडीच्या बिलांसाठी सोमवारी तासगावात मोर्चा

तासगाव, नागेवाडीच्या बिलांसाठी सोमवारी तासगावात मोर्चा

ते म्हणाले यापूर्वी याच ऊस बिल प्रश्नी १६ एप्रिल व ७ जून रोजी आंदोलन करण्यात आली होती. मात्र, आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झालेला नाही. अन्य कारखान्यांनी पहिला हप्ता दिलेला आहे. काही कारखान्यांनी दुसरा हप्ताही दिलेला आहे. मात्र, तासगाव आणि नागेवाडी कारखान्यात जानेवारीपासून गाळप झालेल्या ऊसाचे बिल मिळाले नाही. हेलपाटे मारून मारून शेतकरी थकले आहेत. त्यामुळेच सोमवार दि. २१ रोजी तासगाव येथील खासदार पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी अशोक खाडे, राजेंद्र माने, दामाजी डुबल, संदेश पाटील, शशिकांत माने, गुलाबराव यादव, ज्योतिराम जाधव, सचिन पाटील, महेश जगताप उपस्थित होते.

Web Title: Morcha in Tasgaon on Monday for bills of Tasgaon, Nagewadi