महागाईच्या निषेधार्थ मिरजेत मोर्चा

By Admin | Updated: November 1, 2015 00:01 IST2015-10-31T23:43:20+5:302015-11-01T00:01:41+5:30

थाळीनाद आंदोलन : दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Morcha Front in protest against inflation | महागाईच्या निषेधार्थ मिरजेत मोर्चा

महागाईच्या निषेधार्थ मिरजेत मोर्चा

मिरज : महागाईविरोधात मिरजेत राष्ट्रवादीतर्फे तहसीलदार कार्यालयावर थाळीनाद करीत मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन जीवनावश्यक वस्तूंचा सार्वज्निक वितरण व्यवस्थेव्दारा पुरवठा करण्याची मागणी केली.
गणेश तलावापासून मोर्चाला प्रारंभ झाला. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी नगरसेवक मोर्चात सहभागी होते. थाळीनाद करीत आंदोलक तहसीलदार कार्यालयावर गेले.
मिरज तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार, गटनेते दिग्विजय सूर्यवंशी, साजिद पठाण, मैनुद्दीन बागवान, अभिजित हारगे, मनोज भिसे, राजेश गोसावी, समीर सय्यद, समीर कुपवाडे, समीर शेख, जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, गंगाधर तोडकर, प्रसाद मदभावीकर, योगेंद्र थोरात, असगर शरीकमसलत, महिला आघाडीच्या राधिका हारगे यांच्यासह पुरुष व महिला राष्ट्रवादी कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी होत्या. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात मार्चासमोर बोलताना संजय बजाज, आप्पासाहेब हुळ्ळे, साजिद पठाण यांनी वाढत्या महागाईस राज्य शासन जबाबदार असल्याचे सांगितले.
प्रमोद इनामदार यांनी महागाई रोखण्यास अपयशी ठरल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. आंदोलकांनी नायब तहसीलदार एस. के. सावंत यांना निवेदन दिले. नायब तहसीलदारांनी कक्षाबाहेर येऊन निवेदन स्वीकारण्याची मागणी करीत आंदोलकांनी थाळीनाद करीत तहसीलदार कार्यालयाचे आवार दणाणून सोडले. (वार्ताहर)

Web Title: Morcha Front in protest against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.