जागतिकीकरणाच्या रेट्यातून देशात भांडवलदारांची मक्तेदारी वाढली

By Admin | Updated: October 29, 2014 00:12 IST2014-10-28T23:00:55+5:302014-10-29T00:12:39+5:30

नाना पाटील व्याख्यानमाला : राजा माळगी यांची टीका

The monopoly of capitalists increased in the country by the globalization rating | जागतिकीकरणाच्या रेट्यातून देशात भांडवलदारांची मक्तेदारी वाढली

जागतिकीकरणाच्या रेट्यातून देशात भांडवलदारांची मक्तेदारी वाढली


कवठेएकंद : गेल्या वीस वर्षांच्या काळात देशाने विविध क्षेत्रात प्रगती साधली आहे. पण गॅट करारानंतर जागतिकीकरणाच्या रेट्यातून देशात भांडवलदारांची मक्तेदारी वाढली आहे, अशी टीका प्रा. राजा माळगी यांनी केली.
येथील क्रांतिसिंह नाना पाटील ज्ञानप्रबोधिनी, सार्वजनिक वाचनालयाच्या व्याख्यानमालेत ते ‘आता जागे होऊ या’ या विषयावर बोलत होते. प्रा. राजा माळगी म्हणाले की, १९९४ च्या गॅट करारापासून जागतिकरणाच्या नावाने भारताची अंतर्गत संरचना खिळखिळी करण्याचा प्रयत्न भांडवली शक्तीतून केला जात आहे. कृषीजन्य संस्कृती असणाऱ्या देशातील परंपरा, संस्कृती, इतिहास आणि आदर्शाचा जाणीवपूर्वक ऱ्हास करण्याची व्यवस्था टेलिव्हिजन आणि मोबाईलसारख्या व्यवस्थाद्वारे करण्याचा प्रयत्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील मालिकांसाठी प्रायोजक मिळत नाही; परंतु इतर सासू-सुनांच्या भांडणाच्या मालिका वर्षानुवर्षे चालविल्या जातात. माणसांच्या मन, मेंदू-मनगटात ऊर्जा येऊ नये, अशी जाणीवपूर्वक व्यवस्था केली जात आहे. याचा विचार डोळसपणे होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
व्याख्यानमालेवेळी सूर्यकांत पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष शंकरराव माळी, प्रा. बाबूराव लगारे, वासुदेव गुरव आदी उपस्थित होते. स्वागत राजाराम माळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल देशमाने, अभार विठ्ठल कुंभार यांनी मानले. व्याख्यानमालेवेळी सूर्यकांत पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष शंकरराव माळी, प्रा. बाबूराव लगारे, वासुदेव गुरव आदी उपस्थित होते. स्वागत राजाराम माळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल देशमाने, आभार विठ्ठल कुंभार यांनी मानले. (वार्ताहर)

‘शुभंकरोती’च्या जागी रिमोट!
सायंकाळी घरोघरी असणारी ‘शुभंकरोती’ विस्मृतीत गेली असून, घरच्या गृहिणींच्या हाती आता टीव्हीचे रिमोट आले आहे. सायंकाळी ७ ते १० या प्राईम टाईममध्ये प्रत्येक घराघरातील माणसांमध्ये विष पेरणारी यंत्रणाच टीव्ही माध्यमातून होते आहे. या सर्व घटकांच्या आहारी कितपत जायचे, हे समजले पाहिजे. तरच संस्कारक्षम घर राहू शकेल.

Web Title: The monopoly of capitalists increased in the country by the globalization rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.