पैसा झाला खोटा, दहा रुपयांचे नाणे चालेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST2021-09-21T04:28:40+5:302021-09-21T04:28:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दहा रुपयांचे नाणे चलनातून बंद होणार असल्याची अफवा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पसरवली जात ...

पैसा झाला खोटा, दहा रुपयांचे नाणे चालेना
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दहा रुपयांचे नाणे चलनातून बंद होणार असल्याची अफवा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पसरवली जात आहे. त्यातून बाजारातील या नाण्याचे झिडकारणे सुरुच आहे. अनेक व्यापारी, व्यावसायिक, विक्रेते यांच्याकडून ही नाणी स्वीकारली जात नसल्याने नवी समस्या निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेने अनेकदा याबाबत स्पष्टीकरण करूनही त्याचा परिणाम फारसा होत नसल्याचे दिसत आहे.
चौकट
कुठल्याच नाण्यांवर बंदी नाही
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे की, कोणतीही नाणी चलनातून काढण्याचे धोरण नाही. तसा कोणताही निर्णय झालेला नाही. ही नाणी चलनात असून, ती स्वीकारली पाहिजेत.
कोणती नाणी नाकारतात
सध्या बाजारात १, २, ५ व दहा रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. यात प्रामुख्याने १० रुपयांची नाणी न स्वीकारण्याचे प्रमाण अधिक आहे. वजनामुळे ते मोठ्या प्रमाणावर बाळगणेही कठीण जात असल्याची अनेकांची तक्रार आहे.
चौकट
बँकांमध्येही पाेती भरुन नाण्यांचा मोठा साठा
ग्राहकांकडून नकारघंटा मिळत असल्याने व जमा होणाऱ्या नाण्यांचे प्रमाण अधिक असल्याने अनेक बँकांमध्ये नाण्यांचा मोठा साठा शिल्लक आहे. पोती भरुन ही नाणी ठेवावी लागत आहे.
कोट
कोणतेही नाणे चलनातून जाणार नाही. त्यामुळे सध्या चलनात असलेली नाणी व्यावसायिक, ग्राहकांनी स्वीकारावीत. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता चलनावर विश्वास ठेवावा.
- महेश हरणे, मुख्य प्रबंधक, सांगली अग्रणी बँक
कोट
जास्त प्रमाणात दहा रुपयांची नाणी व्यापारी, व्यावसायिक स्वीकारत नाहीत. बँकांमध्येही तीच अडचण आहे. सामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणावर नाणी दिली तर ती वजन जास्त असल्याने बाळगू शकत नाही.
- योगेश धोंगडे, मिरज
कोट
नाण्यांबाबत वारंवार अफवा पसरविल्या जातात. अनेक ठिकाणी ती स्वीकारली व दिली जात असली तरी ग्राहक जेव्हा शंभरहून अधिक रकमेची नाणी देत असेल तर अनेकजण ती स्वीकारत नाहीत. इतकी नाणी आम्ही ठेवून काय करायची, असे ऐकवले जाते.
- ऋषिकेश मोने, सांगली