आई मला शाळेला जाऊ दे न वं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:45+5:302021-02-05T07:32:45+5:30

सांगली : तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर बुधवारपासून (दि. २७) पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत आहेत. शिक्षणाचा प्रवाह ...

Mom, don't let me go to school .... | आई मला शाळेला जाऊ दे न वं....

आई मला शाळेला जाऊ दे न वं....

सांगली : तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर बुधवारपासून (दि. २७) पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत आहेत. शिक्षणाचा प्रवाह पुन्हा सुरू होणार असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता आहे. वर्गात मित्र-मैत्रिणींसोबत बेंचवर बसण्याचा आनंद लुटण्यासाठी शाळकरी मुले आतूर झाली आहेत.

विद्यार्थ्याला वर्गात प्रवेश देताना पालकाचे संमतिपत्र सक्तीचे असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. तशा सूचना शिक्षकांनी पालकांना दिल्या आहेत. जिल्ह्यात नव्याने कोरोनाबाधितांचे प्रमाण सध्या अत्यल्प असल्याने पालकांचा आत्मविश्वास वाढला आहे. शिवाय लसीकरणही सुरू झाल्याने पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी सकारात्मकही आहेत. शिक्षकांच्या कोरोना तपासण्या वेगाने सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुकास्तरावर ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये तसेच सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयात चाचण्या सुरू आहेत. महापालिकेनेही आरोग्य केंद्रांमध्ये सोय केली आहे. मोठ्या संख्येने शिक्षक असलेल्या शाळांत आरोग्य कर्मचारी स्वत: जात आहेत, तर उर्वरित ठिकाणी शिक्षक स्वत:च चाचणी केंद्रात जात आहेत.

सध्या रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या सुरू आहेत. गरज भासल्यास शिक्षकाची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. एकही शिक्षक कोरोनाबाधित असल्याचा अधिकृत अहवाल अद्याप नाही.

चौकट

वर्गांची तयारी सोमवारपासूनच

शाळांमध्ये पुनश्च हरिओम करण्यासाठी शिक्षकांची तयारी सोमवारपासाूनच सुरू झाली. मंगळवारच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छता व इतर तयारीसाठी शिक्षक सकाळपासूनच कामाला लागले होते. काही शाळांमध्ये वर्गांचे निर्जंतुकीकरण रविवारपासूनच सुरू झाले. काही ठिकाणी ग्रामपंचायतींनी स्वच्छतेसाठी साहित्य दिले, तर काही ठिकाणी पालक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, फवारणी पंप उपलब्ध करून दिले. छोट्या गावांत खुद्द मुलेच साफसफाईच्या कामासाठी स्वच्छेने पुढे आल्याचे दिसले.

चौकट

शाळेत जायचंय मला ...

- १५ मार्चपासून विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. त्यामुळे नव्या आरंभासाठी ते उत्सुक आहेत.

- मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटणार याचीही उत्सुकता लागून आहे.

- तीन-चार महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी ते विद्यार्थ्यांच्या डोक्यात फारसे शिरलेले नाही

- ऑनलाइन शिक्षणात तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करायला लागतोय. मोबाइल उपलब्ध नसण्यापासून रेंज नसण्यापर्यंतची डोकेदुखी विद्यार्थ्यांपुढे आहे.

- मुले महिनो न महिने घरीच राहिल्याने पालकही चिंतित आहेत. घरातील दोघा-तिघा मुलांना एकच मोबाइल कसा पुरणार ही मोठी समस्या त्यांच्यापुढे आहे.

- जिल्हा परिषद शाळांचे विविध शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल अत्यंत चांगले आहेत. खासगी शाळांना याबाबतीत कोसो दूर फेकले आहे. पण वर्ग सुरू नसल्याने ही गुणवत्ता कशी टिकणार हा प्रश्न विद्यार्थी, शिक्षक व पालकांपुढे आहे.

- परीक्षांचा हंगाम तोंडावर असल्यानेही विद्यार्थ्यांना वर्ग सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

कोट

शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करतोय, पण मोबाइलवरून जमत नाही. काहीवेळा सरांच्या घरी जाऊन अभ्यास केला आहे. आता वर्ग सुरू झाल्यावर अभ्यास चांगल्यारितीने करता येईल.

- रोहित काळे, इयत्ता पाचवी

कोट

आम्ही तिघे भाऊ-बहिणी आहोत. एकच मोबाइल असल्याने ऑनलाइन अभ्यासासाठी भांडत बसावे लागते. शाळा सुरू झाल्यास हा त्रास होणार नाही.

- वैष्णवी कोळी, इयत्ता सहावी

कोट

क्लासेस सुरू झाल्याने आता शाळादेखील सुरू व्हाव्यात असे वाटते. गणित, इंग्रजी या अवघड विषयांचा अभ्यास मोबाइलवरून व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच शाळेत जाणार आहे.

- अनघा दांडेकर, इयत्ता सातवी

कोट

आठवीसाठी पहिल्यांदाच हायस्कूलमध्ये जाणार आहे, त्यामुळे शाळा लवकर सुरू व्हावी असे वाटते. माझे मित्रही उत्सुक आहेत.

- पृथ्वीराज चव्हाण, इयत्ता आठवी

पॉईंटर्स

पाचवी ते आठवीसाठी पावणेदोन लाख विद्यार्थी

पाचवी : ४४३८०, सहावी - ४३४९५, सातवी - ४३५४८, आठवी - ४४०७६

-----------

Web Title: Mom, don't let me go to school ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.