माडगुळे येथील विवाहितेचा विनयभंग
By Admin | Updated: May 17, 2015 01:18 IST2015-05-17T01:18:23+5:302015-05-17T01:18:23+5:30
गुन्हा दाखल

माडगुळे येथील विवाहितेचा विनयभंग
आटपाडी : माडगुळे (ता. आटपाडी) येथील एका विवाहितेचा सौरभ श्रीधर विभुते (रा. माडगुळे) याने विनयभंग केला. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास संबंधित विवाहिता लेंगरेवाडी रस्त्याने दुचाकीवरून शेताकडे निघाली होती. त्यावेळी सौरभ याने दुचाकी उभा करून मॅडम, तुम्ही मला तुमचा मोबाईल नंबर का देत नाही, असे विचारत विनयभंग केला. याबाबत विवाहितेने आटपाडी पोलीस ठाण्यात सौरभविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला अटक करण्यासाठी पोलीस नाईक एच. के. लोहार, पी. एन. कांबळे यांनी माडगुळे परिसरात अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र त्याला पकडण्यात शनिवारी सायंकाळपर्यंत पोलिसांना यश आले नाही. (वार्ताहर)