शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

मिरज परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गौस मोमीन टोळीला मोक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 14:13 IST

मोमीन टोळी प्रमुख गौस मोमीन याने वरील सर्व साथीदारांसह मिरजेत गेल्या चार वर्षात टोळी निर्माण करून दहशत निर्माण केली होती.

सांगली : मिरज शहरासह परिसरात गुन्ह्यातून दहशत निर्माण करणाऱ्या गौस ऊर्फ निहाल गब्बार मोमीन टोळीवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. या टोळीतील चौघांपैकी तिघांना अटक करण्यात आली असून, एकजण पसार आहे. संपुर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढणार आहोत, असा निर्धार पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.मोमीन टोळीचा म्होरक्या गौस उर्फ निहाल गब्बर मोमीन (वय २८, रा. धनगर गल्ली, बुधवार पेठ, सध्या रा. मिरज), समर्थ संजय गायकवाड (वय १८, रा. हाडको कॉलनी, शंभर फुटी, मिरज), जावेद बंडुखान शेख (वय २७, रा. झरी मस्जीद जवळ, मिरज) व एक अल्पवयीन अशा चौघांचा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांत समावेश आहे.मोमीन टोळी प्रमुख गौस मोमीन याने वरील सर्व साथीदारांसह मिरजेत गेल्या चार वर्षात टोळी निर्माण करून दहशत निर्माण केली होती. मोमीन टोळीने खुनाचा प्रयत्न, दरोडा, बनावट नोटा बाजारात आणणे, पिस्तुल बाळगणे हे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्यात केले आहेत. मोमीन टोळीवर मोका अंतर्गत कारवाईसाठी गांधी चाैक पोलिसांनी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. पोलिस अधीक्षकांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविला होता. त्या प्रस्तावास पोलिस महानिरीक्षक लोहिया यांनी मंजुरी दिली असून मोमीन टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी