आरोग्याधिकाऱ्यांचा कक्षात मोकाट कुत्री सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST2021-06-29T04:18:59+5:302021-06-29T04:18:59+5:30
सांगली : शहरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, नागरिकांसह वाहन चालकांवर हल्ले वाढले आहे. येत्या चार दिवसांत मोकाट कुत्र्यांचा ...

आरोग्याधिकाऱ्यांचा कक्षात मोकाट कुत्री सोडणार
सांगली : शहरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, नागरिकांसह वाहन चालकांवर हल्ले वाढले आहे. येत्या चार दिवसांत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आरोग्याधिकाऱ्यांचा कक्षात कुत्री सोडू, असा इशारा भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांनी दिला आहे.
काही महिन्यांपूर्वी विश्रामबागमधील स्वच्छता निरीक्षकावर मोकाट कुत्र्याने हल्ला चढविला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर, चार दिवस कुत्री पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. मात्र, त्यानंतर ही मोहीम थंडावली आहे. शहरातील प्रत्येक उपनगरात मोकाट कुत्री कळपाने फिरत असून, नागरिकांसह वाहन चालकांवर हल्ले करत आहे. पालिकेची आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष असून, नागरिकांचा जीव जाण्याची वाट पाहताय का, असा सवाल सिंहासने यांनी व्यक्त केला आहे.
महापालिका क्षेत्रात काही वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार, सुमारे पंधरा ते वीस हजार मोकाट कुत्री आहेत. त्यांची पैदास रोखण्यासाठी ठोस नसबंदी होण्याची गरज आहे. मात्र, सद्यस्थितीत ही नसबंदी मोहीम ठप्प आहे. नसबंदी करण्यात येणाऱ्या ठिकाणाची दुरवस्था असल्याने पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी थांबविण्याच्या सूचना दिल्या आहे. मात्र, त्यानंतरही पालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने नसबंदी मोहीम बंद आहे. यामुळे कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. तत्काळ उपाययोजना झाल्या पाहिजेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.