मोकाट घोड्यांमुळे अपघातांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:30 IST2021-08-24T04:30:03+5:302021-08-24T04:30:03+5:30

सांगली : शहरातील प्रमुख वर्दळीच्या मार्गावर आता घोड्यांनी ठाण मांडल्याने वाहनधारकांना अडचणी येत आहेत. रात्रीच्या वेळी घोड्यांचा रंग ओळखू ...

Mokat horses invite accidents | मोकाट घोड्यांमुळे अपघातांना निमंत्रण

मोकाट घोड्यांमुळे अपघातांना निमंत्रण

सांगली : शहरातील प्रमुख वर्दळीच्या मार्गावर आता घोड्यांनी ठाण मांडल्याने वाहनधारकांना अडचणी येत आहेत. रात्रीच्या वेळी घोड्यांचा रंग ओळखू येत नसल्याने अनेकदा अपघात होत आहेत. सांगली-मिरज मार्गावर अगदी दुभाजकाला लागूनच घोडे बसत असल्याने अपघात वाढले आहेत. मोकाट घोड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

-------

बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर कारवाई

सांगली : बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरूच आहे. त्यानुसार पोलिसांनी जत, पलूस भागात कारवाई करत देशी दारू जप्त केली, तर विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला. यापुढे ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

-----

जिल्ह्यात लवकरच कार्डियाक रुग्णवाहिका

सांगली : जिल्ह्यात असलेल्या ६० प्राथमिक आरोग्य केंद्रांत अधिक चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहिका देण्याची व्यवस्था केली आहे. लोकांच्या सेवेसाठी ही व्यवस्था सुस्थितीत असणे आवश्यक आहे. काही ठिकाणी कार्डियाक ॲम्ब्युलन्स आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

Web Title: Mokat horses invite accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.