संजयनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:23+5:302021-06-30T04:17:23+5:30

संजयनगर : सांगली शहरातील संजयनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. ...

Mokat dogs in Sanjaynagar area | संजयनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर

संजयनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर

संजयनगर : सांगली शहरातील संजयनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सांगलीतील संजयनगर, अभयनगर, रामरहीम कॉलनी, अभिनंदन कॉलनी, साईनगर, शिंदेमळा, राजुनगर, राजनगर, चिंतामणीनगर, शाहुनगर, चैतन्यनगर, साठेनगर, वसंतनगर, लक्ष्मीनगर या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहेत. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना रात्री रस्त्यावरून फिरणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी कुत्रे नागरिकांच्यावर हल्ला करतात. संजयनगर परिसर मोठा आहे. याठिकाणी कधीही कुत्रे पकडण्यासाठी डॉग व्हॅन येत नाही. नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Mokat dogs in Sanjaynagar area