संजयनगर येथे महापालिका कर्मचाऱ्यांवर मोकाट कुत्र्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:17+5:302021-07-07T04:33:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संजयनगर : सांगलीतील संजयनगर येथे महापालिका आरोग्य विभागात डॉग व्हॅनवर काम करणारे कर्मचारी परशुराम वसंत ...

संजयनगर येथे महापालिका कर्मचाऱ्यांवर मोकाट कुत्र्याचा हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : सांगलीतील संजयनगर येथे महापालिका आरोग्य विभागात डॉग व्हॅनवर काम करणारे कर्मचारी परशुराम वसंत कांबळे (वय ३३) यांच्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोकाट कुत्र्याने हल्ला केला. कांबळे यांना उपचारासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. यात त्यांच्या उजव्या पायाला जखम झाली आहे.
आराध्या प्रदीप दुपटे (वय ९) वर्षे या बालिकेवर रविवारी संजयनगर येथे मोकाट कुत्र्याने हल्ला केला होता. अनेक नागरिक व बालकांवर अनेक वेळा मोकाट कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. यामुळे नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट कुत्री पकडण्यात महापालिकेला अपयश आले आहे. याकडे महापालिका व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
060721\img-20210706-wa0055.jpg
फोटो ओळ संजयनगर येथे महापालिका आरोग्य विभागात डाँग व्हाँनवर काम करणारे कर्मचारी परशुराम कांबळे कुत्राने हल्ला केल्याने जखमी झाली आहेत.(छाया ः सुरेंद्र दुपटे)