मोहित्यांचे वडगावला अंगणवाडी सेविकांना दप्तरांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:53+5:302021-06-16T04:35:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार मोहनराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी मोहित्यांचे वडगाव येथे अंगणवाडी सेविकांना जिल्हा ...

मोहित्यांचे वडगावला अंगणवाडी सेविकांना दप्तरांचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार मोहनराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी मोहित्यांचे वडगाव येथे अंगणवाडी सेविकांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. मालन मोहिते व सरपंच विजय मोहिते यांच्याहस्ते दप्तरांचे वाटप करण्यात आले.
मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथे वृक्षारोपणासाठी विविध रोपांचे वाटप करण्यात आले. स्मशानभूमीसह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. अंगणवाडी सेविकांना मालन मोहिते व विजय मोहिते यांच्याहस्ते दप्तरांचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक पी. बी. पाटील, लिपीक नवनाथ मोहिते, अंगणवाडी सेविका सुवर्णा मोहिते, वंदना मोहिते, अप्सरा शिकलगार, वनीता पवार, धनश्री कुंभार, यास्मीन शिकलगार, दीपिका काळे उपस्थित होते.
फोटो - १५०६२०२१-विटा - मोहिते वडगाव : मोहित्यांचे वडगाव येथे मंगळवारी मालन मोहिते व विजय मोहिते यांच्याहस्ते अंगणवाडी सेविकांना दप्तरांचे वाटप करण्यात आले.