मोहनराव कदम यांचा आज ‘सोनहिरा’वर सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:32 IST2021-09-09T04:32:08+5:302021-09-09T04:32:08+5:30

सांगली/कडेगाव : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांचा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते सत्कार होणार ...

Mohanrao Kadam felicitated on 'Sonhira' today | मोहनराव कदम यांचा आज ‘सोनहिरा’वर सत्कार

मोहनराव कदम यांचा आज ‘सोनहिरा’वर सत्कार

सांगली/कडेगाव : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांचा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. वांगी येथील सोनहिरा मल्टिपर्पज हॉलमध्ये गुरुवारी (दि. ९) दुपारी ३ वाजता हा सत्कार सोहळा आयोजित केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी दिली.

आमदार सावंत म्हणाले की, आमदार मोहनराव कदम यांनी १९७८पासून अपवादवगळता सातत्याने प्रदीर्घकाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सक्षमपणे कार्यभार सांभाळला. जिल्ह्यातील पक्षाच्या वाटचालीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान व्हावा या उद्देशाने जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला आहे. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जयश्रीताई पाटील व मोजकेच निमंत्रित कार्यकर्ते उपस्थित राहाणार आहेत. यावेळी शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील उपस्थित होते.

चौकट

ऑनलाइन प्रक्षेपण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी सत्कार समारंभ काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांना राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या फेसबुक पेजवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून लाइव्ह पाहता येणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.

Web Title: Mohanrao Kadam felicitated on 'Sonhira' today