सांगलीत मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:24 IST2021-08-01T04:24:15+5:302021-08-01T04:24:15+5:30

सांगली : शहरातील विविध भागात सुरु असलेल्या मोबाईल चाेरीच्या प्रकारांमधील वाढ कायम आहे. शुक्रवारी शहरातील विविध भागातून तीन मोबाईल ...

Mobile thieves in Sangli | सांगलीत मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

सांगलीत मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

सांगली : शहरातील विविध भागात सुरु असलेल्या मोबाईल चाेरीच्या प्रकारांमधील वाढ कायम आहे. शुक्रवारी शहरातील विविध भागातून तीन मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी सांगली शहर व संजयनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आबीद महमद खाटीक (रा. गणेशनगर, सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवार बाजार परिसरात खाटीक यांचे मटण दुकान असून, शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास या दुकानातून ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास करण्यात आला. संतोष पायगोंडा देसाई (रा. चिंचवाड, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कॉलेज कॉर्नरवर असलेल्या एका फायनान्स कंपनीत ते कामाला आहेत. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास या परिसरातून चोरट्यांनी त्यांचा ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला.

खणभागातील सारवाण गल्लीमध्ये राहण्यास असलेल्या शकीर मुसा बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. हा चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Mobile thieves in Sangli