मिरजेतील वानलेस हॉस्पिटलमध्ये मोबाईल चोरट्यास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST2021-06-16T04:36:24+5:302021-06-16T04:36:24+5:30
मिरज : मिरजेत वाँन्लेस हॉस्पिटलमध्ये महिलेचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यास हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन ...

मिरजेतील वानलेस हॉस्पिटलमध्ये मोबाईल चोरट्यास पकडले
मिरज : मिरजेत वाँन्लेस हॉस्पिटलमध्ये महिलेचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यास हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन दिवसांपूर्वी याच चोरट्याने उपचारासाठी दाखल महिला रुग्णाचा मोबाईल लंपास केल्याचे निष्पन्न झाले. अक्षय चव्हाण असे या चाेरट्याचे नाव आहे.
वानलेस रुग्णालयाच्या प्रसूतिगृहातून सना मुल्ला यांच्याकडून फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल मागून घेत चोरट्याने तेथून पळ काढला हाेता. याबाबत मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी याच चोरट्याने एका रुग्णाच्या नातेवाईक महिलेचा मोबाईल फोन करण्यासाठी मागून घेतला. मोबाईल हातात आल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्याने हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्याला पकडले. चोप देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.