मित्राच्या घरातून मोबाइल चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST2021-02-10T04:27:27+5:302021-02-10T04:27:27+5:30
... अपघातात एक जण जखमी सांगली : कसबेडिग्रज-इस्लामपूर रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. विलास परमेश्वर ...

मित्राच्या घरातून मोबाइल चोरीस
...
अपघातात एक जण जखमी
सांगली : कसबेडिग्रज-इस्लामपूर रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. विलास परमेश्वर ढगे (वय ४०, मंगळवेढा) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी ओंकार दत्तात्रय कुलकर्णी (वय ३३, रा. सातारा) याच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. ढगे हे मूळचे मंगळवेढा येथील असून ऊसतोडणी मजूर आहेत. इस्लामपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून दुचाकीने निघाले होते. त्या वेळी रस्ता ओलांडताना चारचाकीने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. तसेच वाहनाचे सात हजारांचे नुकसान झाले. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे.
...
सांगलीतून दुचाकी चोरीस
सांगली : येथील विष्णू घाट परिसरात लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रेणुका काशीनाथ पुजारी (वय ३२) यांनी फिर्याद दिली. ही चोरी शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
...
सांगलीतून मोबाइलचे कार्ड चोरीस
सांगली : चिंतामणीनगरमधील एका बंगल्यातून मोबाइलचे चार कार्ड चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विवेक नंदकुमार देशपांडे यांनी फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.