मेणी परिसरात मोबाइल सेवा कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:21+5:302021-05-19T04:26:21+5:30
कोकरूड : शिराळा तालुक्यातील गुढे-पाचगणी पठारासह मेणी परिसरात मोबाइल टॉवर महिन्यातून कधी तरी सुरू असतात. यामुळे येथील लोकांचा जगाशी ...

मेणी परिसरात मोबाइल सेवा कुचकामी
कोकरूड : शिराळा तालुक्यातील गुढे-पाचगणी पठारासह मेणी परिसरात मोबाइल टॉवर महिन्यातून कधी तरी सुरू असतात. यामुळे येथील लोकांचा जगाशी संपर्क होत नसल्याने लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
येथील टॉवर म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी परिस्थिती या भागाची आहे.
गुढे-पाचगणी पठार जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील गाव मेणी खोरा म्हणजे डोंगरकपारीत वसलेली गावे. पठारावर तीन गावे, वस्त्या आहेत, तर मेणी परिसरात दहा वाड्या-वस्ती आहेत. पठारावर गुढे येथे तर खाली रांजणवाडी येथे भारतीय दूरसंचार विभागाचे टॉवर उभे करण्यात आले आहे. या कंपनीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कंपनीचे मोबाइल टॉवर या परिसरात नसल्याने या परिसरातील लोकांना याच टॉवरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, हे दोन्ही टॉवर महिन्यातील चार ते पाचच दिवस सुरू राहत असल्याने या भागातील लोकांचा संपर्क होत नाही.