शामरावनगरमधून मोबाईल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:31+5:302021-09-02T04:55:31+5:30
महिलेचे दागिने लंपास सांगली : सांगली बसस्थानक परिसरात एका महिलेचे दागिने व रोकड असा ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ...

शामरावनगरमधून मोबाईल लंपास
महिलेचे दागिने लंपास
सांगली : सांगली बसस्थानक परिसरात एका महिलेचे दागिने व रोकड असा ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी दोन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडला. या प्रकरणी निकिता रोहन तेली (२४, रा. हडको काॅलनी, कुपवाड रोड) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
--------
सांगलीवाडीतून दुचाकी लंपास
सांगली : सांगलीवाडी येथील मंगल कार्यालयासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी अनिल रामचंद्र जाधव (३६, रा. पत्रकारनगर) याने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
------
गणेश मार्केटमधून दुचाकी लांबविली
सांगली : येथील गणेश मार्केटसमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केली. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी विजय श्रीकांत शिंदे (३२, रा. सूरज पार्क, मिरज) याने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.