मनसे भिलवडी ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST2020-12-14T04:38:35+5:302020-12-14T04:38:35+5:30

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकीदीनिशी उतरणार असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष रोहित ...

MNS will contest Bhilwadi Gram Panchayat elections | मनसे भिलवडी ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणार

मनसे भिलवडी ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणार

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकीदीनिशी उतरणार असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष रोहित भोकरे यांनी दिली.

मागील दोन वर्षापासून मनसेचे विभाग अध्यक्ष रोहित भोकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षनेते व कार्यकर्ते जनसेवेत कार्यरत आहेत. पूरस्थिती असो किंव्हा कोरोनासारख्या रोगाची परिस्थिती असो, या काळात सतत मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यरत आहेत. लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांच्या घरी अन्नपुरवठा करणे, या काळामध्ये जनतेला त्रास देणाऱ्या फायनान्स कंपनीला जाब विचारणे, पाणीपुरवठा सुरळीत चालू ठेवणे, रस्ते दुरुस्ती करणे, नाल्यांची स्वच्छता करून घेणे, र्सेनिक होमिओपॅथिकसारख्या रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्या देणे, गावातील रखडलेली कामे मार्गी लावणे, प्राथमिक आरोग्य केंद्रामधे ऑक्सिजनचा पुरवठा करणे, अशी विविध कामे महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे. त्यामुळे परिसरातील जनतेचा विश्वास बळकट होत चालला आहे, परिसरातील युवकांचा पक्षप्रवेश होत आहे, यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खूप मोठ्या उत्सुकतेने येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज आहे.

Web Title: MNS will contest Bhilwadi Gram Panchayat elections