शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आझादी गौरव यात्रेत आमदार विश्वजित कदमांनी १० कि.मी अंतर चालत, धावत गाठले, कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 12:40 IST

सत्ता असो वा नसो नेतृत्व ओक्केच

प्रताप महाडीककडेगाव : राजकीय व्यक्ती म्हटलं की नेहमी आपल्यासमोर एक चित्र उभा राहतं ते पांढरे कपडे, पाठीमागे कार्यकर्त्यांचा गराडा. पण काही नेते असेही असतात की आपल्या बिझी शेड्यूलमध्येही आरोग्याबाबत सजग असतात. त्यातील एक म्हणजे माजी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम. मतदारसंघावर पकड, कार्यकर्त्यांची फौज, प्रभावी वक्तृत्त्व आणि फिजिकल फिटनेससाठी जागरुक असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. युवकांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे.काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेच्या निमित्ताने ते पुन्हा चर्चेचत आले आहेत. देवराष्ट्रे ते सोनहीरा कारखाना अशा पदयात्रेच्या निमित्ताने फुटबॉलपटू असलेले आमदार कदम चालताना नव्हे तर चक्क धावतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत १० कि.मी अंतर चालत आणि धावत गाठले.२०१२ मध्ये झाली होती मोठी चर्चानेहमी राज्याच्या राजकारणात सक्रिय  असणारे विश्वजित कदम हेल्दी राहण्याकडे विशेष लक्ष देत असतात. दिवस कितीही गडबड, गोंधळाचा असूद्यात पण त्यातूनही फिट राहावे म्हणून ते विशेष वेळ काढत असतात. सन २०१२ मध्ये त्यांच्या फिटनेसबाबत मोठी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी बुलढाणा ते सांगली अशी ६०० कि.मी अंतराची संवाद पदयात्रा काढून दुष्काळी पट्ट्यातील लोकांना मदत करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. तसेच शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या विविध योजना लोकांना मिळवून दिल्या. त्यानंतर आता ते काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेच्या निमित्ताने १० कि.मी अंतर चालताना आणि धावताना दिसले.सत्ता असो वा नसो नेतृत्व ओक्केचप्राणायाम, व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीवर आमदार कदम यांचा भर असतो. त्यांनी आपला फिटनेस अगदी उत्तम राखला आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर  गल्ली पासून दिल्ली पर्यंत आवाज उठवत मोर्चे आंदोलने आणि पदयात्रा काढून सरकारला जाग आणण्यासाठी कार्यरत राहण्याची त्यांच्यात क्षमता आहे. यामुळे सत्ता असो वा नसो आमचं नेतृत्व ओक्केच अशी प्रतिक्रिया पलूस कडेगाव मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते देत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदम