शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

'आगामी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव निश्चित'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 16:14 IST

मत आमचे, सत्ता तुमची हे समीकरण चालणार नाही.

इस्लामपूर : काँग्रेस व भाजप एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस, शिवसेनेकडे आघाडीसाठी प्रस्ताव पाठवू नये. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा इस्लामपुरात आजअखेर उभा राहिला नाही. त्याची किंमत जयंत पाटील यांना चुकवावी लागेल. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी दिला.इस्लामपुरात रविवारी डीपीआयचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अधिवेशन झाले. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, संदीप ठोंबरे, अशोकराव आगावणे, एस. के. येवळे, मोहन मदने, अशोक वायदंडे, नंदकुमार नांगरे, सोहम लोंढे, रमेश चांदणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. कांबळे म्हणाले, बहुजन समाजातील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी डीपीआय लढणार आहे. साडेतीन टक्के लोकांची देशात सत्ता येत असेल तर ८५ टक्के लोकांनी भिकेचे कटोरे घेऊन फिरायचे नाही. मत आमचे, सत्ता तुमची हे समीकरण चालणार नाही.वामन मेश्राम म्हणाले. आज कधीही विकला न जाणारा समाज बनवावा लागेल. राज्यात आंबेडकरवादी विचाराच्या पक्षाची पोकळी निर्माण झाली आहे. उद्देश व विचारधारा स्पष्ट पाहिजे, तरच उपेक्षित समुदाय समाजाच्या मुख्य प्रवाहात येईल.यावेळी अजिंक्य चांदणे, अशोक वायदंडे, सोहम लोंढे, संदीप ठोंबरे, एस. के. आयवळे, मोहन मदने यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे स्वागत केले. सतीश लोंढे, दिलीप कुरणे, कबीर चव्हाण, सूरज वाघमारे, शंभू बल्लाळ, मानसिंग बल्लाळ, सुनील घेवदे, विशाल नांगरे यांनी संयोजन केले.

अधिवेशनातील ठराव..!अधिवेशनात सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. मागासवर्गीय विकास महामंडळांना २ हजार कोटींची तरतूद करावी. सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोग पुनर्गठित करून शिफारशी लागू कराव्यात. शिक्षण क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण करावे. गायरान जमिनीवरील शेती व वसाहती कायम कराव्यात. नरवीर उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, असे ठराव करण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटील