शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आमदार अपात्र निकाल: पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं, नार्वेकर यांचा निर्णय...

By अशोक डोंबाळे | Updated: January 8, 2024 18:36 IST

नेते गेले, लोक इंडिया आघाडीकडे

सांगली : पक्षांतर बंदी कायद्याचे राज्यात उल्लंघन झालं आहे, मात्र ते कोणी मान्य करायला तयार नाहीत, न्यायालयाने सांगून देखील विलंब लावला जातोय, आता १० तारखेची मुदत दिली आहे, यावेळी देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय राजकीय असेल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदारपृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, न्यायालयाने मुदत दिलेली असल्याने नार्वेकर यांना निर्णय घ्यावाच लागेल, मात्र ते विधानसभेचे अध्यक्ष असले तरी एका पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय पूर्णतः राजकीय निर्णय असेल हा माझा विश्वास आहे, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय काही निर्णय घेईल का ? हे पाहावे लागणार आहे. निवडणुकीचे गणित साधे आहे, २०१४ मध्ये भाजपला ३१ टक्के तर २०१९ मध्ये ३७ टक्के मतदान झाले होते.  बालकोट प्रकरणामुळे २०१९ ला मते वाढली होती. आता तसे वातावरण नाही. राजीव गांधी यांनीच प्रथम राम मंदिराचे दरवाजे उघडले राम मंदिराच्या बाबतीत राजीव गांधी यांनीच प्रथम मंदिराचे दरवाजे उघडले होते. मात्र न्यायालयाकडून ज्यांना जमीन मिळेल, त्यांना समर्थन काँग्रेस करेल अशी भूमिका होती, तीच आहे. सध्या खासगी ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर उभा राहत असून त्याचा आम्हाला आनंद आहे. पण निवडणुकीत रोजगार, महागाई, भ्रष्टाचाराचे प्रश्न सोडविण्यात भाजप अपयशी ठरल्यामुळे त्यांची मते ३४ टक्केच असणार आहेत. उर्वरित सर्व घटक पक्षांना एकत्रीत करुन ६६ टक्के मते खचून एकास एक तुल्यबळ उमेदवार देण्याचा निर्णय इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी धोरण निश्चित केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आमचेच आहेत. पण, अन्य छोट्या-मोठ्या पक्षांनाही बरोबर घेतले आहे. वंचित, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही इंडिया आघाडीबरोबरच असणार असून त्यासाठी प्रयत्न चालू आहेत.यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व वसंतदादा सहकारी साखर करखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

  • ईडीच्या माध्यमातून दहशत, धमक्या देण्याचा प्रयत्न
  • मराठा आंदोलकाना सरकारने योग्य वागणूक द्यावी, अन्यथा गंभीर परिणाम
  • ओबीसी विरुद्ध मराठा भांडणे लावण्याचे काम सध्या सुरू
  • ईव्हीएम यंत्राबाबत मतदारांना शंका असल्यामुळे बऱ्याच देशांनी नाकारले आहे. लोकांना शंका असेल तर पेपर बेस निवडणुका व्हाव्यात.
  • प्रामाणिकपणे लढणार असाल, तर वंचितने इंडिया आघाडीशी चर्चा करावी, केवळ मीडियात बोलून काही होणार नाही.
  • लोकशाही धोक्यात आली आहे. रशियात पुतीनने केले, चीनमध्ये सद्या जे चालले आहे, ते आता भारतात होईल की काय अशी भीती वाटू लागलीय.
टॅग्स :SangliसांगलीMLAआमदारRahul Narvekarराहुल नार्वेकरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण