शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार अनिल बाबरांच्या पत्नी शोभा यांचे अल्पशा आजाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 13:34 IST

आमदार अनिल बाबर यांच्या राजकीय वाटचालीत त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.

विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल कलजेराव बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर (वय-६२) यांचे आज, बुधवारी सकाळी अल्पश: आजाराने निधन झाले. त्या काकी या नावाने सर्वत्र परिचित होत्या. आज सायंकाळी गार्डी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.गेल्या दहा दिवसांपासून शोभाकाकी यांना फुफ्फुसाचा त्रास होत होता. त्यामुळे सुरुवातीला त्यांना विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रारंभी त्यांची प्रकृती स्थिर होती. परंतु त्यानंतर यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते.मुलगा नगरसेवक अमोल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास आणि स्वतः आ. अनिल बाबर हे देखील त्यांच्या उपचारावर सातत्याने लक्ष ठेवून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी आमदार  अनिल बाबर यांची दीनानाथ रुग्णालयात जाऊन भेट घेत काकींच्या तब्येतीची विचारपूस केली होती.मात्र आज, बुधवारी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार अनिल बाबर यांच्या राजकीय वाटचालीत त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या निधनाने खानापूर मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या पश्चात पती आमदार अनिलभाऊ, तसेच माजी नगरसेवक अमोल बाबर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहास बाबर ही दोन मुले, दीर, जाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.

टॅग्स :Sangliसांगली