आष्ट्यात ‘मिस कॉल द्या, नगरसेवक तुमच्या दारात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:25 IST2021-04-14T04:25:19+5:302021-04-14T04:25:19+5:30

आष्टा : आष्टा शहरात ‘नगरसेवक तुमच्या दारी’ अभियान सुरू करण्यात आले आहे. मिस कॉल द्या, नगरसेवक तुमच्या दारात येईल, ...

'Miss call, corporator at your door' | आष्ट्यात ‘मिस कॉल द्या, नगरसेवक तुमच्या दारात’

आष्ट्यात ‘मिस कॉल द्या, नगरसेवक तुमच्या दारात’

आष्टा :

आष्टा शहरात ‘नगरसेवक तुमच्या दारी’ अभियान सुरू करण्यात आले आहे. मिस कॉल द्या, नगरसेवक तुमच्या दारात येईल, अशी माहिती पालिकेतील विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांनी दिली.

शहरातील ज्योतिर्लिंग चौकात या अभियानाचे वीर कुदळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष अमोल पडळकर, वर्षा अवघडे, दिलीप कुरणे, डॉ. सतीश बापट, शिवसेना शहरप्रमुख राकेश आटुगडे, नंदकिशोर आटुगडे, गणेश माळी, सूरज उंडाळे, जनगोंड पाटील उपस्थित होते.

पालिकेच्या पाणीपट्टी, घरपट्टी, पंतप्रधान घरकुल योजना, नगरपालिका शौचालय अनुदान, बांधकाम परवाना, विद्युत खांबावरील वीज व्यवस्था याबाबतीतील तक्रारी, आरोग्यविषयक तक्रारी, रस्ता, गटर स्वच्छता, कचरा समस्या, शेती पंप तसेच घरगुती वीज कनेक्शन या समस्यांसह तहसील व चावडीमधील समस्या, नगर भूमापन, पोलीस ठाणे, रेशन कार्ड, ग्रामीण रुग्णालय यासह विविध समस्या सोडवण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कुदळे यांनी दिली.

Web Title: 'Miss call, corporator at your door'