शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील लाडेगाव ग्रामपंचायतीत २५ लाख रुपयांचा अपहार, ..अन् अपहाराचे मिळाले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 18:10 IST

दलित वस्ती आणि वित्त आयोगाच्या निधीचा मनमानीपणे वापर करून हा अपहार करण्यात आला आहे.

इस्लामपूर : लाडेगाव (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीमध्ये दलितवस्ती आणि वित्त आयोगाच्या निधीमधून अंदाजे २५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील यांनी केला. याचवेळी त्यांनी हा अपहार करणाऱ्या तत्कालीन सरपंच व अधिकाऱ्यांकडून त्याची वसुली करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.या अपहाराची माहिती देण्यासाठी पाटील यांनी पत्रकार बैठक घेतली. वरील अपहाराची पुराव्यासहीत जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे तक्रार केली आहे. प्रथमदर्शनी सर्व पुरावे पाहून डुडी यांनी चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्वाही दिल्याचे पाटील यांनी सांगितले.ते म्हणाले, घटना दुरुस्ती आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आल्या आहेत. लाडेगावमध्ये दलित वस्ती आणि वित्त आयोगाच्या निधीचा मनमानीपणे वापर करून हा अपहार करण्यात आला आहे.काम न करता बिले काढणे, विकासकामांच्या मोजमापामध्ये फेरफार करणे, एलईडी बल्बची बाजारभावापेक्षा पाचपट अधिक दराने खरेदी, गटार, रस्ते, पाइपलाइन, काँक्रीटीकरण, पेव्हिंग ब्लॉक, बंधारा दुरूस्ती, शाळा इमारत दुरुस्ती, अंगणवाडी दुरुस्ती, सदोष एमबी नोंदी, उपकार्यकारी अभियंत्यांच्या स्वाक्षरीशिवाय बिले काढणे अशा पद्धतीने हा अपहार झाला आहे.कोरोनाच्या काळात तत्कालीन सरपंच राजू पाटील, ग्रामसेवक डी. पी. सिंग, पं. स.चे निवृत्त अभियंता सूर्यवंशी यांचा यामध्ये सहभाग आहे. गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यांनी चौकशी करण्यापेक्षा चुका करणाऱ्यांना पाठिशी घालण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे या सर्व संबंधितांवर कारवाईसाठी पाठपुरावा करत आहोत.स्वखर्चाने दप्तर तपासणी..बी. जी. पाटील यांनी माहिती अधिकारातील कायदेशीर हक्काचा वापर करत ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी करण्यासाठी १ हजार रुपयांची अनामत रक्कम भरली. कायद्यानुसार दप्तराची तपासणी करण्यासाठी पहिला तास मोफत, तर पुढील प्रत्येक तासाला ५ रुपये याप्रमाणे शुल्क आकारले जाते. या कायदेशीर हक्काचा वापर करत पाटील यांनी हा अपहार पुराव्यासहीत समोर आणला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी