मिरजेच्या लाचखोर सहायक निरीक्षकास कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:49+5:302021-09-10T04:33:49+5:30
सांगली : दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिरज ग्रामीण ...

मिरजेच्या लाचखोर सहायक निरीक्षकास कोठडी
सांगली : दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिरज ग्रामीण ठाण्यातील सहायक निरीक्षक समाधान वसंत बिले (वय ४२, मूळ खोमनाळ, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याला शुक्रवारी न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती उपाधीक्षक सुजय घाटगे यांनी शुक्रवारी दिली.
संशयित लाचखोर बिले याची मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नेमणूक आहे. त्याच्याकडे तपास असलेल्या एका गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांच्या नातेवाईकास आरोपी न करण्यासाठी त्याने २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदारांनी २७ ऑगस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी मिरजेत हिरा हॉटेल चौकात सापळा लावण्यात आला. सायंकाळी बिले याला लाचेचे २५ हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्याच्या घरावरही छापे टाकण्यात आले.