मिर्झा गालिब उर्दू लायब्ररीने वाचन संस्कृती जपली : अशोकराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST2021-02-10T04:27:47+5:302021-02-10T04:27:47+5:30
आष्टा : येथील मिर्झा गालिब उर्दू लायब्ररीस महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे सरचिटणीस डाॅ. अशोकराव पाटील तसेच सांगली ...

मिर्झा गालिब उर्दू लायब्ररीने वाचन संस्कृती जपली : अशोकराव पाटील
आष्टा : येथील मिर्झा गालिब उर्दू लायब्ररीस महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे सरचिटणीस डाॅ. अशोकराव पाटील तसेच सांगली जिल्हा राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. कृष्णा मंडले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ‘पावसातील सह्याद्री : शरद पवार’ हे पुस्तक भेट दिले.
डॉ. अशोकराव पाटील म्हणाले, ‘मिर्झा गालिब उर्दू लायब्ररीने वाचन संस्कृती जपण्यासाठी करत असलेले काम आदर्शवत आहे. यावेळी मिर्झा गालिब उर्दू लायब्ररीचे अध्यक्ष इम्तियाज मुन्शी, संचालक उस्मान जमादार, आबिद मुल्ला, शिराज मुजावर उपस्थित होते.
फोटो : ०९ आष्टा १
ओळ : आष्टा येथील मिर्झा गालिब जनरल उर्दू लायब्ररीला डॉ. अशोकराव पाटील, प्रा. कृष्णा मंडले यांनी पुस्तक भेट दिले. यावेळी इम्तियाज मुन्शी, शिराज मुजावर, उस्मान जमादार, आबिद मुल्ला उपस्थित हाेते.