मिरजेत महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST2020-12-05T05:08:48+5:302020-12-05T05:08:48+5:30
पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष ...

मिरजेत महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा जल्लोष
पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शुक्रवारी सकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी साखर, पेढे वाटून विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे अभिजित हारगे, नगरसेविका संगीता हारगे, संजय मेंढे, करण जामदार, राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा राधिका हारगे, मिलिंद हारगे, शिवसेनेचे संजय काटे, विशाल रजपूत यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात, स्वाती पारधी यांनी ५० किलो लाडू वाटप करून निकालाचे स्वागत केले.
फोटो-०४मिरज१.२