प्रवासी वाहतूक संघटनेतर्फे मिरजेत शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:19 IST2021-02-20T05:19:59+5:302021-02-20T05:19:59+5:30
मिरज : सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक ॲपेरिक्षा संघटना व मिरज रेल्वे जंक्शन रिक्षा संघटनेतर्फे मिरज रेल्वेस्थानकात छत्रपती शिवाजी ...

प्रवासी वाहतूक संघटनेतर्फे मिरजेत शिवजयंती
मिरज : सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक ॲपेरिक्षा संघटना व मिरज रेल्वे जंक्शन रिक्षा संघटनेतर्फे मिरज रेल्वेस्थानकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, वाहतूक शाखेच्या प्रज्ञा देशमुख, तानाजी मालुसरे यांचे वंशज संकेत मालुसरे, विलास देसाई, विद्याताई नलावडे, माजी महापौर किशोर जामदार, हारून खतीब, अतिश अग्रवाल, जावेद पटेल, संतोष जाधव, रशीद शेख, रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, अजमुद्दिन खतीब यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी बंडू तोडकर, मोसिन पठाण, महेश सातवेकर, लक्ष्मण शिंदे, आरिफ शेख, अमीन मुल्ला, संजय बने, बाळू खतीब, मशीन काजी, मकसूद खतीब, तोफिक काझी, अझरुद्दीन खतीब, सरफराज काझी, मुख्तार काजी, पापा पठाण, संतोष झळके, समीर निशाणदार, फिरोज दर्यावर्दी, इनायत झारी, ओमकार दुर्वे, अख्तर काजी उपस्थित होते. यावेळी विद्याताई नलावडे यांनी ‘शंभू गौरव’ व ‘शिवचरित्र’ या पुस्तकांचे वाटप केले.