मिरजेत लिंगायत समाज मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:33 IST2021-02-25T04:33:08+5:302021-02-25T04:33:08+5:30

ओळ : मिरज येथे वीरशैव लिंगायत मंचच्या मेळाव्यात जयगाेंड काेरे यांनी मार्गदर्शन केले. मिरज : हिंदू वीरशैव लिंगायत मंचतर्फे ...

Mirajet Lingayat Samaj Melava | मिरजेत लिंगायत समाज मेळावा

मिरजेत लिंगायत समाज मेळावा

ओळ : मिरज येथे वीरशैव लिंगायत मंचच्या मेळाव्यात जयगाेंड काेरे यांनी मार्गदर्शन केले.

मिरज : हिंदू वीरशैव लिंगायत मंचतर्फे मिरजेत वीरशैव लिंगायत मेळावा पार पडला. लिंगायत समाजास सरसकट ओबीसी आरक्षण व महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या निर्मितीची यावेळी मागणी करण्यात आली.

यावेळी बेरोजगार लिंगायत तरुण तरुणींसाठी महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना आवश्यक असल्याचे जयगोंड कोरे यांनी सांगितले. राज्यात सर्व लिंगायत समाज, संघटना, समिती यांना एकत्रित करुन ओबीसी आरक्षणासह महात्मा बसवेश्वर महाराज महामंडळाची स्थापना व एक हजार कोटींच्या तरतुदीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करणार असल्याचेही जयगोंड कोरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिवयोगी शिवचार्य महास्वामीजी, शरदराव गंजीवाले, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, स्थायी सभापती पांडुरंग कोरे यांनी मार्गदर्शन केले. नीलेश हिंगमिरे, अजित संगाई, रामदास देशिंगे यांनी संयोजन केले. नीलेश हिंगमिरे यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास लिंगायत समाजातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Mirajet Lingayat Samaj Melava