शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: विधानसभा मतदारसंघ फेररचनेत मिरज यापुढे राखीव राहणार नाही - मंत्री मुश्रीफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:39 IST

सांगली महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू

मिरज : विधानसभा मतदारसंघ फेररचनेत मिरज विधानसभा मतदारसंघ यापुढे राखीव राहणार नाही. त्यामुळे मिरजेचा पुढील विधानसभेचा आमदार राष्ट्रवादीचा निवडून द्या, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.मिरजेत सोमवारी आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेचे मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे, शिंदेसेनेचे मिरज शहरप्रमुख विजय शिंदे, भाजपचे ईश्वर जनवाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

हसन मुश्रीफ म्हणाले की, मिरज व सांगली दोन्ही शासकीय रुग्णालये अद्ययावत करून सर्व उपचार येथे होतील. यापुढे कोणत्याही रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागणार नाही. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात, माजी नगरसेविका स्वाती पारधी, महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, मिरज महिला शहराध्यक्ष शीतल सोनवणे, व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सांगली महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूराज्यात भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेचे महायुतीचे सरकार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती झाली तर ठीक, नाही तर जेथे युती होणे शक्य नाही. तिथं मात्र मैत्रीपूर्ण लढती कराव्या लागतील. राष्ट्रवादीच्या चिन्हावर स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे लागतील. कोणत्याही परिस्थितीत सांगली महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

यांनी केला पक्षप्रवेशचंद्रकांत मैंगुरे, नीता आवटी, विजय शिंदे, किरण कांबळे, जब्बार मुजावर, आकाश चव्हाण, डॉ. अमर कुरणे, शुभम साळुंखे, योगेश आवळे, भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ईश्वर जनवाडे, मिरज शहर सरचिटणीस संदीप कबाडे, मालगाव ग्रामपंचायत विद्यमान सदस्य जावेद मुल्ला या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला.