मिरजेत वाहतूक शाखेतर्फे दोन महिन्यांत साडेचौदा लाख दंडवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:24 IST2021-03-14T04:24:21+5:302021-03-14T04:24:21+5:30
राज्यात १ मे २०१९ पासून संपूर्ण राज्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकावर ऑनलाईन दंडाची आकारणी करण्यात सुरू झाली आहे. या ...

मिरजेत वाहतूक शाखेतर्फे दोन महिन्यांत साडेचौदा लाख दंडवसुली
राज्यात १ मे २०१९ पासून संपूर्ण राज्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकावर ऑनलाईन दंडाची आकारणी करण्यात सुरू झाली आहे. या दोन वर्षाच्या कालावधीत ऑनलाईन दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने ही थकीत रक्कम वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. सांगली जिल्ह्यातही सुमारे ७ कोटी रुपये दंडाची रक्कम थकीत आहे. मिरज वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबवून जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत जिल्ह्यातील व परजिल्ह्यांतील वाहनचालकांकडून साडेचौदा लाख रुपये थकीत दंडाची वसुली केली आहे. ज्या वाहनधारकांकडे ऑनलाइन दंडाची रक्कम थकीत आहे, त्यानी वाहतूक शाखेकडे जमा करावी अन्यथा सक्तीने वसूल करण्यात येणार असल्याचे मिरज वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल माने यांनी सांगितले.