मिरज तालुका राष्ट्रवादीचे काम कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST2021-07-01T04:19:06+5:302021-07-01T04:19:06+5:30
म्हैसाळ : वाळवा तालुक्यानंतर मिरज तालुक्यात बूथ कमिटी व राष्ट्रवादीच्या सेल कमिटीचे काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झाले आहे. हे ...

मिरज तालुका राष्ट्रवादीचे काम कौतुकास्पद
म्हैसाळ : वाळवा तालुक्यानंतर मिरज तालुक्यात बूथ कमिटी व राष्ट्रवादीच्या सेल कमिटीचे काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झाले आहे. हे काम कौतुकास्पद असल्याचे मत जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.
ते राष्ट्रवादीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार व तालुका आढावा बैठक नियोजनात बोलत होते. जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीबद्दल विराज नाईक व महिला जिल्हाध्यक्षपदी निवडीबद्दल सुश्मिता जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
अविनाश पाटील म्हणाले की, संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी बळकट करण्याचे काम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करीत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पक्ष बळकट करण्यासाठी बूथ कमिटी व सेल कमिटी यांची संघटना मजबूत करणे गरजेचे असते. हेच काम मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखालील मिरज तालुक्यात झाले आहे. या कामांची पोचपावती लवकरच देण्यात येईल.
यावेळी कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवती जिल्हाध्यक्ष पूजा लाड, मिरज तालुकाध्यक्ष तानाजी दळवी, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, जीवन पाटील, मिरज मार्केट कमिटीचे सभापती वसंतराव गायकवाड, प्रमोद ईनामदार, गंगाधर तोडकर, संताजीराव गायकवाड, वास्कर शिंदे, महिलाध्यक्षा अनिता कदम उपस्थित होते.