मिरज तालुक्यात २२ ग्रामपंचायतींसाठी २४१ जागांसाठी ५५६ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:53+5:302021-01-08T05:28:53+5:30

तालुक्यातील मालगाव, मल्लेवाडी, विजयनगर, म्हैसाळ, शिपूर, कर्नाळ, भोसे, कळंबी, एरंडोली, आरग, लिंगनूर, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, तानंग, ढवळी, कवलापूर, डोंगरवाडी, अंकली, ...

In Miraj taluka, 556 candidates are contesting for 241 seats for 22 gram panchayats | मिरज तालुक्यात २२ ग्रामपंचायतींसाठी २४१ जागांसाठी ५५६ उमेदवार रिंगणात

मिरज तालुक्यात २२ ग्रामपंचायतींसाठी २४१ जागांसाठी ५५६ उमेदवार रिंगणात

तालुक्यातील मालगाव, मल्लेवाडी, विजयनगर, म्हैसाळ, शिपूर, कर्नाळ, भोसे, कळंबी, एरंडोली, आरग, लिंगनूर, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, तानंग, ढवळी, कवलापूर, डोंगरवाडी, अंकली, इनामधामणी, चाबुकस्वारवाडी, कवठेपिरान व तुंग या २२ ग्रामपंचायतींतात दुरंगी व तिरंगी लढती होणार आहेत.

अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ३८८ जणांनी ४१० अर्ज माघारी घेतल्याने २२ ग्रामपंचायतींच्या २४१ जागांसाठी ५६४ जण निवडणूक रिंगणात राहिले आहेत. २२ पैकी ९ ग्रामपंचायतींपैकी इनामधामणीमध्ये १०, कवलापूर येथे ३, ढवळी येथे ५, भोसे येथे ७, विजयनगर येथे १ व अंकलीतील ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. डोंगरवाडी येथे २ व इनामधामणीतील १ जागा रिक्त राहिली.

मालगाव ग्रामपंचायतीत ५९, मल्लेवाडी २५, विजयनगर २०, म्हैसाळ ३४, शिपूर १६, कर्नाळ २८, भोसे १७, कळंबी ३१, एरंडोली ३९, आरग ५१, लिंगनूर २८, शिंदेवाडी १९, लक्ष्मीवाडी ११, तानंग २४, ढवळी १०, कवलापूर २८, डोंगरवाडी १०, अंकली १९, इनामधामणी ५, चाबुकस्वारवाडी १८, कवठेपिरान येथे ३४ आणि तुंगमध्ये ३० उमेदवार मैदानात आहेत.

Web Title: In Miraj taluka, 556 candidates are contesting for 241 seats for 22 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.