मिरजेत तरुणीच्या गळ्याला चाकू लावून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:11+5:302021-03-13T04:48:11+5:30
गडदे कुटुंब झोपेत असताना त्यांच्या घराच्या मागील दरवाजाला भोक पडून दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी अविनाश ...

मिरजेत तरुणीच्या गळ्याला चाकू लावून लूट
गडदे कुटुंब झोपेत असताना त्यांच्या घराच्या मागील दरवाजाला भोक पडून दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी अविनाश यांची बहीण वर्षा गडदे यांच्या खोलीत प्रवेश केला. खोलीतील तिजोरी उघडताना आवाज झाल्याने वर्षा यांना जाग आली. दोन चोरट्यांनी वर्षा गडदे हिच्या गळ्याला चाकू लावून तिजोरीची चावी मागून घेतली. तिजोरीतील पाच तोळे सोने, चांदी चाळीस ग्रॅम व ४७ हजार रुपये रोख रक्कम, असा अडीच लाखांचा ऐवज चोरून घेऊन चोरट्यांनी पलायन केले.
चोर पळून गेल्यानंतर वर्षा गडदे यांनी आरडाओरडा केल्यानंतर दुसऱ्या खोलीत झोपलेल्या आई व भावाने तेथे धाव घेतली. गडदे यांनी मिरज ग्रामीण पोलिसांना पाचारण केले. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी पोबारा केला. याबाबत अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.