शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

ड्रग्ज तस्करीची पाळेमुळे कुपवाडसह मिरज, सांगलीत; तस्करांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे आव्हान

By घनशाम नवाथे | Updated: February 23, 2024 12:38 IST

पुणे पोलिसांनी तिघांना पकडून तपासासाठी नेले असले तरी कुपवाड पोलिसांसह गुन्हे अन्वेषणला येथील छोट्या तस्करांचे ‘नेटवर्क’ उद्ध्वस्त करण्याची गरज

घनशाम नवाथेसांगली : मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्ज तपास प्रकरणात कुपवाड कनेक्शन उघड झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक करून ३०० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त केला. कुपवाडमध्ये साठा सापडल्यामुळे ड्रग्ज तस्करीची पाळेमुळे कुपवाडसह मिरज, सांगली परिसरांत रुजल्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी तिघांना पकडून तपासासाठी नेले असले तरी कुपवाड पोलिसांसह गुन्हे अन्वेषणला येथील छोट्या तस्करांचे ‘नेटवर्क’ उद्ध्वस्त करण्याची गरज आहे.सन २०११ मध्ये कुपवाडला अभिजित कोंडुसकरकडे ‘केटामाईन’चा साठा जप्त केला होता. त्यानंतर २०१५ मध्ये कोंडुसकरचा भाऊ रवींद्र कोंडुसकर, आयुब मकानदारसह आणखी एकास एमडी ड्रग्ज प्रकरणात अटक केली. या प्रकरणात मकानदार कारागृहात होता. कारागृहात असताना त्याने ड्रग्ज तस्करांशी ओळख वाढवली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा तस्करांच्या संपर्कात राहिला. पुण्यातील साथीदारांनी दिलेला एमडी ड्रग्जचा साठा त्याने कुपवाडमध्ये आणून ठेवला. हा साठा पुन्हा पुण्याकडे पाठवण्यात येणार होता. तत्पूर्वी पुणे पोलिसांच्या कारवाईत कुपवाड कनेक्शन उघड झाल्यामुळे मकानदार पुन्हा जाळ्यात सापडला.

मकानदारसह साथीदार अक्षय तावडे, खोलीमालक रमजान मुजावर या तिघांना पकडून पोलिसांनी पुण्याला नेले. पुणे पोलिसांनी तिघांना तपासासाठी नेले असले तरी एमडी ड्रग्ज तस्करी व विक्रीत आणखी काहीजण सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक एमडी ड्रग्जचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे आव्हान गुन्हे अन्वेषणसह स्थानिक पोलिसांपुढे आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या तपासानंतर स्थानिक पोलिसांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.

एमडीच्या नशेचा बाजारमिरज हे गांजा तस्करीच्या अनेक केंद्रांपैकी एक आहे. मिरजेत यापूर्वी कोकेन, हेरोईन, ब्राऊन शुगर तस्करीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यानंतर अलीकडच्या काळात एमडीच्या नशेचा बाजार सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

स्वस्तात मोठी नशाकोकेन, हेरोईनच्या किमतीपेक्षा एमडीची किंमत थोडी कमी आहे. तसेच नशेचा अंमल जास्त काळ राहतो. त्यामुळे एमडीला मोठ्या शहरात पसंती दिली जाते. मेफेड्रोन हे वनस्पतीसाठी बनवलेले कृत्रिम खत आहे. मनगटावर पावडर टाकून नाकपुडीतून ओढून याची नशा केली जाते.

पुन्हा कुपवाड चर्चेतसन २०११ मध्ये केटामाईन, २०१५ मध्ये एमडी ड्रग्ज आणि पुन्हा २०२४ मध्ये एमडी ड्रग्जमुळे कुपवाड राज्यभर चर्चेत आले आहे. त्यामुळे कुपवाड आणि परिसरात ड्रग्जची पाळेमुळे रुजल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस