शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे मिरज-सांगलीत घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 14:41 IST

‘दार उघड उद्धवा दार उघड’, अशी घोषणा देत मिरज येथे सांगली जिल्हा भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीने तर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. मिरजेतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे मिरज-सांगलीत घंटानाद आंदोलनराज्यातील मंदिरे उघडण्याची केली मागणी

मिरज/सांगली : ‘दार उघड उद्धवा दार उघड’, अशी घोषणा देत मिरज येथे सांगली जिल्हा भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीने तर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. मिरजेतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

राज्यातील मंदिरे त्वरीत उघडावी या मागणीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मैदान दत्त मंदिर मिरज येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.घंटा, टोल, झांजा, टाळ, चिपळ्या, शंख आदी वाद्य सहित महाआरती करण्यात आली. यावेळी  चंद्रकांत पाटील म्हणाले, की गेले सहा महिने राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत, राज्य सरकार दारू दुकान उघडते तर मंदिर का बंद ठेवते. हे शासन अश्रद्ध शासन आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा देवतांवर विश्वास होता, पण कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस ही दोन भुते बरोबर घेतल्याने मुख्यमंत्री ठाकरे सुद्धा अश्रद्ध झाले असावेत.यावेळी भाजपा सांस्कृतिक आघाडी जिल्हा प्रमुख ओमकार शुक्ल, महापालिका सभापती संदीप आवटी, नगरसेवक पांडुरंग कोरे, नगरसेवक निरंजन आवटी, माजी महापौर संगीता खोत, सरचिटणीस मोहन वाटवे, श्रीकांत शिंदे, महादेव अण्णा कुरणे डॉ भालचंद्र साठे, गणेश चौगुले, जयगोंड कोरे, बाबासाहेब आळतेकर, शीतल पाटोळे राजेंद्र नातू, सुजाता रक्तवान, ज्योती कांबळे, रुपाली देसाई, अनघा कुलकर्णी माधुरी मिसाळ, जितेंद्र ढोले, तानाजी घार्गे, गजेंद्र कुल्लोळी, हृषिकेश कुलकर्णी, किशोर पटवर्धन, अजिंक्य हंबर, शानवाज सौदागर, साजिदआली पठाण, श्रीकांत महाजन, गजानन जाधव, संदीप कबाडे, महेश फोंडे, नाना मेंढे, अमरसिंग चव्हाण, शंकर इसापुरे, महेश फोंडे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाTempleमंदिरmiraj-acमिरजSangliसांगली