छायाचित्राची धमकी देत मिरजेत विवाहितेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:10+5:302021-02-05T07:24:10+5:30
पीडित विवाहित महिला घरची परिस्थिती गरिबीची असल्याने एका हाॅटेलात काम करीत होती. तेथे सोबत काम करणाऱ्या ...

छायाचित्राची धमकी देत मिरजेत विवाहितेवर बलात्कार
पीडित विवाहित महिला घरची परिस्थिती गरिबीची असल्याने एका हाॅटेलात काम करीत होती. तेथे सोबत काम करणाऱ्या विजय मगदूम याची पीडितेशी ओळख झाली. मगदूम याने महिलेशी लगट करीत वारंवार मोबाइलवर फोन करून तिला भेटीसाठी बोलावले. मात्र पीडितेने मगदूम यास भेटण्यास नकार दिला. भेटण्यास आली नाहीस तर तुझ्या पतीस आपल्या मैत्रीबाबत सांगतो. तुझ्या घरात येऊन गळफास लावून घेतो, अशा धमक्या दिल्या. यामुळे नाइलाजाने पीडितेने त्याची भेट घेतली. भेटीवेळी मोबाइलवर काढलेले फोटो नवऱ्याला दाखवून बदनामीची धमकी देत मगदूम याने मार्च २०१९ ते दि. २२ जानेवारी २०२१ दरम्यान मिरजेतील लाॅजवर व मालगाव रस्त्यावरील उसाच्या शेतात नेऊन बलात्कार केला. याबाबत कोणास काही सांगितल्यास नवऱ्याला संबंधाची माहिती देण्याचा धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत मिरज शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे.