मिरजेत रेल्वेस्थानक ट्रीमिक्स रस्ता विकास आराखड्याप्रमाणे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST2021-01-13T05:08:20+5:302021-01-13T05:08:20+5:30

रेल्वेस्थानकापर्यंत सुमारे अडीच कोटींच्या ट्रीमिक्स रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुधार समितीचे ॲड. ए. ए. काझी, ...

Miraj railway station trimix do as per road development plan | मिरजेत रेल्वेस्थानक ट्रीमिक्स रस्ता विकास आराखड्याप्रमाणे करा

मिरजेत रेल्वेस्थानक ट्रीमिक्स रस्ता विकास आराखड्याप्रमाणे करा

रेल्वेस्थानकापर्यंत सुमारे अडीच कोटींच्या ट्रीमिक्स रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुधार समितीचे ॲड. ए. ए. काझी, संतोष माने, जावेद पटेल, मुस्तफा बुजरूक, शंकर परदेशी, असिफ निपाणीकर, अफजल बुजरुक, राकेश तामगावे, श्रीकांत महाजन, सचिन गाडवे, राजा देसाई आदींनी रस्ता कामाची पाहणी करुन रस्त्याची मापे घेतली. या रस्त्याची रुंदी ८० फूट भासवून ६० फूट रस्ता करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. विकास आराखड्यात ८० फुटी रस्ता असताना ६० फुटी करण्यात येत असल्याबद्दल समितीने हरकत घेतली.

स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांना पाचारण करून विकास आराखड्याप्रमाणे रस्ता करावा, येथील झाडांचे पुनर्राेपण करावे, अशी मागणी करण्यात आली. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Web Title: Miraj railway station trimix do as per road development plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.