शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पोलिसांना हवीय बाळाची अन् मातेची डीएनए टेस्ट, पळवलेल्या संशयित महिलेला दोन दिवस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 19:38 IST

मिरज : मिरज शासकीय रुग्णालयातून बाळ चोरून नेणाऱ्या सारा साहेबा साठे या महिलेस न्यायालयाने ८ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली ...

मिरज : मिरज शासकीय रुग्णालयातून बाळ चोरून नेणाऱ्या सारा साहेबा साठे या महिलेस न्यायालयाने ८ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. सारा हिच्याकडून ताब्यात घेतलेले बाळ कविता आलदर यांचेच आहे, हे निश्चित करण्यासाठी पोलिसांनी बाळाची डीएनए चाचणी करण्याची शिफारस केली आहे.मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून शनिवारी दुपारी तीन दिवसांचे नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली. एका अज्ञात महिलेने या बालकाला पळवून नेल्याने खळबळ उडाली होती. कोळे, ता. सांगोला येथील कविता समाधान आलदर या प्रसूत महिलेच्या नवजात अर्भकास सारा साठे या महिलेने पळवून नेले. सिव्हिलमधून चोरीस गेलेल्या बाळाला गांधी चौक पोलिसांनी ५६ तासांत शोधून काढले. बाळ चोरणारी महिला व नवजात बालकास सावळज (ता. तासगाव) येथून ताब्यात घेण्यात आले. सारा हिला मूल नसल्याने तिने अर्भक चोरल्याची कबुली दिली आहे. मात्र नवजात अर्भकाची तस्करी अथवा अन्य कारणासाठी हा प्रकार घडला आहे काय, याची पोलिस चौकशी करीत आहेत. सारा साठेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाच्या तपासासाठी मिरज न्यायालयाने तिला दोन दिवस पोलिस कोठडी दिली.साठे हिच्याकडून ताब्यात घेतलेले बाळ कविता आलदर यांचेच आहे हे निश्चित करण्यासाठी बाळाची डीएनए तपासणी करण्यात येणार असल्याचे गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुनील गिड्डे यांनी सांगितले.

चौकशी अहवाल आज सादर होणारया प्रकरणाच्या चौकशीसाठी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्य समितीचा अहवाल बुधवारी सादर होणार असल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी यांनी सांगितले.

काय असते डीएनए चाचणीडीएनए म्हणजे डीऑक्सिरिबोन्यूक्लिक ॲसिड. यात रक्ताचा किंवा स्त्रावचा नमुना घेतला जातो. या चाचणीद्वारे बाळ कोणाचे आहे हे निश्चित केले जाते. यात बाळ, आई आणि वडिलांच्या डीएनएची तुलना केली जाते.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजPoliceपोलिस