मिरज पंचायत समितीच्या सभापती सुनीता पाटील राजीनामा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST2020-12-09T04:21:59+5:302020-12-09T04:21:59+5:30

मिरज पंचायत समितीत भाजपची सत्ता आहे. इतर सदस्यांनाही संधी देण्यासाठी भाजपचे नेते खा. पाटील व आ. सुरेश खाडे यांनी ...

Miraj Panchayat Samiti chairperson Sunita Patil will resign | मिरज पंचायत समितीच्या सभापती सुनीता पाटील राजीनामा देणार

मिरज पंचायत समितीच्या सभापती सुनीता पाटील राजीनामा देणार

मिरज पंचायत समितीत भाजपची सत्ता आहे. इतर सदस्यांनाही संधी देण्यासाठी भाजपचे नेते खा. पाटील व आ. सुरेश खाडे यांनी सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी चार महिन्यांचा कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सुनीता पाटील यांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची इच्छुक सदस्यांनी प्रथम ज्येष्ठ सदस्य विक्रम पाटील, काकासाहेब धामणे यांच्याकडे मागणी केली. पाटील व धामणे यांनी सभापती पाटील यांच्याशी चर्चा करूनही राजीनामा देण्यास टाळाटाळ केली. अद्याप राजीनामा न दिल्याने सत्ताधारी भाजप सदस्यांत नाराजी आहे. अखेर त्रिशला खवाटे, गीतांजली कणसे या इच्छुक सदस्यांच्या समर्थकांनी व विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, उमेश पाटील यांनी खा. पाटील यांची भेट घेऊन सभापती पाटील यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा केली. खा. पाटील यांनी ठरल्याप्रमाणे सभापतीपदात बदल होईल, अशी भूमिका घेत सभापती पाटील यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. राजीनामा घेण्याची जबाबदारी साहेबरराव जगताप यांच्यावर त्यांनी सोपविली आहे. खा. पाटील यांचा आदेश असल्याने सभापती पाटील यांना राजीनामा द्यावा लागणार आहे.

चौकट

गाडगीळ लक्ष घालणार का ?

मिरज पंचायत समितीत भाजपची सत्ता आल्यानंतर सभापती पदासाठी सदस्यांना समान संधी देऊन पूर्व - पश्चिम असा समतोल राखला जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र चारही वेळा पूर्व भागाला सभापती पदाची संधी देण्यात आली, मात्र, पश्चिम भागाला सभापती पदाची संधी न देता डावलल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. आ. सुधीर गाडगीळ यांनी या निवडीत लक्ष घालून सभापतीपद पश्चिम भागाला मिळवून देण्यासाठी आग्रही राहावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

Web Title: Miraj Panchayat Samiti chairperson Sunita Patil will resign