मिरजेत चारित्र्याचा संशयातून पत्नीचा खून, पतीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST2021-07-20T04:19:55+5:302021-07-20T04:19:55+5:30

मिरज : मिरजेतील टाकळी रस्त्यावर शिवम् पार्क येथे चेतन आनंदा माने (वय ३२) याने पत्नी पूजा चेतन माने (वय ...

Miraj murder of wife on suspicion of character, husband arrested | मिरजेत चारित्र्याचा संशयातून पत्नीचा खून, पतीस अटक

मिरजेत चारित्र्याचा संशयातून पत्नीचा खून, पतीस अटक

मिरज : मिरजेतील टाकळी रस्त्यावर शिवम् पार्क येथे चेतन आनंदा माने (वय ३२) याने पत्नी पूजा चेतन माने (वय २५) हिचा चारित्र्याच्या संशयावरून चाकूने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. खून करून फरार झालेल्या चेतन माने यास पोलिसांनी खूनप्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

टेलरिंगचे काम करणारा चेतन माने हा व्यसनाधीन असून पत्नी पूजा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिच्याशी वारंवार भांडण करीत होता. रविवारी दुपारी चेतन याने चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पत्नीसोबत भांडण केले. रागाच्या भरात त्याने पत्नी पूजा हिच्या छातीवर, पोटावर, पाठीवर चाकूचे वार करून पलायन केले. पूजा माने हिला गंभीर जखमी अवस्थेत नातेवाइकांनी मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पत्नीच्या खूनप्रकरणी फरार चेतन माने यास साेमवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची पाच दिवसांसाठी पाेलीस काेठडीत रवानगी केली.

Web Title: Miraj murder of wife on suspicion of character, husband arrested