मिरज आणखी दोन रेमडेसिविर इंजेक्शन गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:35 IST2021-04-30T04:35:36+5:302021-04-30T04:35:36+5:30
रेमडेसिविरच्या दोन इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी पोलिसांनी मिरज सिव्हिलमधील अधिपरिचारक सुमित हुपरीकर व खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ ...

मिरज आणखी दोन रेमडेसिविर इंजेक्शन गायब
रेमडेसिविरच्या दोन इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी पोलिसांनी मिरज सिव्हिलमधील अधिपरिचारक सुमित हुपरीकर व खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ दाविद वाघमारे यांना चार दिवसांपूर्वी अटक केली आहे. या गंभीर प्रकाराबाबत सिव्हिल प्रशासनाच्या समितीमार्फत चाैकशी सुरू आहे. चाैकशीदरम्यान रेमडेसिविर साठ्यातील आणखी दोन इंजेक्शन कमी असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. रेमडेसिविर काळाबाजारात आणखी काही जणांच्या सहभागाची शक्यता असून सिव्हिल प्रशासनाने वेगवेगळ्या वाॅर्डातून गायब झालेल्या इंजेक्शनचा शोधासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची चाैकशी केली. मात्र इंजेक्शनचा हिशेब लागत नसल्याने याबाबत पोलिसांत तक्रार देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
पोलिसांकडून या प्रकाराचा सखोल तपास झाल्यास यात सहभाग असलेले रॅकेट व आणखी रेमडेसिविर इंजेक्शन चोरीचा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. सिव्हिलमधील इंजेक्शन विक्रीत सिव्हिलबाहेरील आणखी काही जणांचा सहभाग असल्याचीही चर्चा आहे. गेल्या वर्षभर कोरोना रुग्णांच्या उपचारात महत्त्वाची भूमिका असलेले मिरज सिव्हिल रुग्णालय रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजारामुळे चर्चेत आले आहे.