मिरजेत लोणीबाजार रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:27 IST2021-04-20T04:27:55+5:302021-04-20T04:27:55+5:30
मिरज : मिरजेत प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर भरणारा भाजीबाजार रोखण्यासाठी लोणीबाजार रस्ता बंद करण्यात आला आहे. लोणीबाजार ...

मिरजेत लोणीबाजार रस्ता बंद
मिरज : मिरजेत प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर भरणारा भाजीबाजार रोखण्यासाठी लोणीबाजार रस्ता बंद करण्यात आला आहे.
लोणीबाजार रस्त्यावर विक्रेते व हातगाड्यांची गर्दी होत असल्याने रस्त्यावरील विक्रेत्यांना रोखण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना येथे तैनात करण्यात आले आहे. भाजीविक्रेते रस्त्यावर ठाण मांडत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत असल्याने या रस्त्यावरील विक्रेत्याना पिटाळून लावण्यात आले. लाॅकडाऊन काळात रस्त्यावरील बाजारास प्रशासनाने प्रतिबंध केला असतानाही लोणीबाजार दत्त चाैक परिसरात भाजीविक्रेते व हातगाडीचालक रस्त्यावर येत असल्याने भाजी खरेदीसाठी गर्दी होत आहे. लोणीबाजाराशिवाय भाजीविक्रेत्यानी शिवाजी रस्त्यावरही व्यवसाय सुरू केला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने भाजीविक्रेते वारंवार रस्त्यावर येत आहेत. रस्त्यावरील बाजार रोखण्यासाठी लोणीबाजार रस्ता बंद करण्यात आला असून या रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.